Yaariyan 2 : यारियां 2 (Yaariyan 2) च्या टीझरने लोकांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. त्या दरम्यान या चित्रपटातील कलाकार चित्रपटाविषयी विविध व्यासपीठांवर बोलत आहेत. त्यामध्ये अभिनेता मीझान जाफरीने (Meezaan Jafri) यारियां 2 च्या निमित्ताने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या भावंडांसोबतचा खास बॉंड शेअर केला आहे.
काय म्हणाला मीझान जाफरी?
मीझान जाफरीचा मलाल चित्रपटातील अभिनय सर्वांनाच प्रचंड आवडला होता. त्याने तेव्हा प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतर सोशल मीडियावर देखील त्याचं फॅन फॉलोईंग प्रचंड वाढलं आहे. त्यानंतर आता मीझान यारियां 2 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या भावंडांसोबतचा खास बॉंड शेअर केला आहे.
National Film Awards 2023 : राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये पुष्पाच्या संगीतकारांचा अनोखा सन्मान!
या चित्रपटामध्ये मीझान दिव्या खोंसला कुमार आणि पर्ल पुरी यांच्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा भावंडांभोवती फिरणारी आहे. त्यामुळे एक भावनिक बंध असणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे अभिनेता मीझान जाफरीने या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या भावंडांसोबतचा खास बॉंड शेअर केला आहे.
Anushka Sharma: विराट अन् अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा होणार?
मीझान जाफरी म्हणाला की, मला अनेक भावंड आहेत. त्यात मी सर्वात लहान आहे. त्यामुळे मला मोठ्या भावंडांकडून मारहाण केली जायची. आम्ही मस्ती करायचो. पण माझे बहिण भाऊ अत्यंत प्रेमळ असल्याने मी हा भावंडांचा बंध अनुभवला आहे. त्यामुळे मी यारिया 2 चित्रपटातील भावंडांसोबतचा खास बॉंड समजू शकतो. यामध्ये दिव्या खोंसला कुमार आणि पर्ल पुरी यांनी माझ्या भावंडांच्या भूमिका साकरल्या आहेत. असं म्हणत त्याने यारियां 2 च्या निमित्ताने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या भावंडांसोबतचा खास बॉंड शेअर केला आहे.