‘हक़’च्या यशावर यामी गौतम धरच्या साधेपणाने जिंकली मनं, जाणून घ्या तिने श्रेय कुणाला दिलं?

Yami Gautam : या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने वेगळं ठरलं आहे.

Yami Gautam

Yami Gautam

Yami Gautam : या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने वेगळं ठरलं आहे, आणि ते म्हणजे यामी गौतम धर. हक़च्या माध्यमातून अभिनेत्रीने केवळ वर्षातील सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक दिला नाही, तर भारतीय सिनेमातील सर्वोत्तम कलाकारांमध्ये आपली जागाही पक्की केली. हक़ ला जिथे समीक्षकांकडून भरभरून प्रशंसा मिळाली, तिथेच हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी एक भावनिक कथा ठरला.

चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादांवर अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत यामी म्हणाली, “हक़ हा माझ्या करिअरमधील सर्वाधिक कौतुक मिळालेल्या चित्रपटांपैकी एक आहे आणि ज्यांनीही हा चित्रपट पाहिला आहे, त्यांनी सांगितलं की तो त्यांना मनापासून स्पर्श करून गेला. मला खूप वैयक्तिक आणि भावनिक असे अनेक संदेश मिळाले आहेत. मला मनापासून वाटतं की याचं श्रेय सगळ्यांनाच जातं. ही कधीच एका व्यक्तीची गोष्ट नसते, ना एखाद्याचा एकट्याचा प्रवास किंवा यश असतं, आणि मी ह्याच विचाराने काम करते. त्यामुळे मी कधीच असं म्हणू शकत नाही की हा फक्त माझा चित्रपट होता किंवा हे फक्त माझं यश होतं.”

ही साधेपणाची भावना हक़ च्या आत्म्यालाच प्रतिबिंबित करते असा चित्रपट जो लक्ष वेधण्यासाठी गोंगाट करत नाही, तर शांतपणे खोल ठसा उमटवतो. समीक्षकांनी यामीच्या संयमित अभिनयाची, भावनांची सखोल समज आणि आतून साकारलेल्या अभिनयाची विशेष प्रशंसा केली आहे, आणि याला या वर्षातील सर्वात मजबूत महिला-केंद्रित भूमिकांपैकी एक मानलं आहे. केवळ कथा किंवा दिग्दर्शनासाठीच नव्हे, तर ज्या प्रामाणिकपणे आणि विश्वासाने यामीने आपली भूमिका साकारली आहे, त्यासाठीही भरभरून कौतुक झालं आहे.

आपल्या भूमिकेशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला या विषयावर खूप विश्वास होता. या पात्राबद्दल माझी जी समज होती, तिच्या भावना, तिचा प्रवास कसा असू शकतो, हे सगळं मी मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात कल्पना आणि वास्तव यांचा संगम असला, तरी तो प्रत्येकासाठी सोपा आणि आपलासा वाटावा हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, जेणेकरून तो पाहणारा कुठलाही माणूस तो कुठल्याही जेंडर, समुदाय, जात किंवा पार्श्वभूमीचा असो  स्वतःला त्याच्याशी जोडू शकेल.”

शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी मतदारसंघातून तुतारी केली गायब –

हा विश्वास पडद्यावर स्पष्टपणे दिसून येतो. हक़मध्ये यामी कथा पुढे जाऊ देते आणि कधीही तिच्यावर हावी होत नाही. ती संवादांइतकाच शांततेवरही विश्वास ठेवते. चित्रपटात तिचे अनेक प्रभावी संवाद आणि मोनोलॉग्स आहेत, पण काही असे भावनिक प्रसंगही आहेत जिथे तिचे डोळेच सगळं काही सांगून जातात. गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रभावी भूमिका साकारल्यानंतर हक़ हा तिच्या कलात्मक प्रवासातील एक असा टप्पा वाटतो, जो पूर्णत्वाला गेलेला आहे  आत्मविश्वासाने भरलेला, बेधडक आणि कथाकथनाशी खोलवर जोडलेला. जसं-जसं 2025 पुढे सरकत आहे, तसं हे अधिकाधिक स्पष्ट होत चाललं आहे की जेव्हा लक्षात राहणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या आणि भावनिक करणाऱ्या अभिनयाची गोष्ट येते, तेव्हा त्या अर्थाने हे वर्ष यामी गौतम धरचं आहे.

Exit mobile version