Download App

Article 370 Song Dua : यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटातलं पहिलं गाणं ‘दुआ’ रिलीज…

Article 370 Song Dua : यामी गौतमच्या (Yami Gautam)आगामी ‘आर्टिकल 370’ (Article 370)या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता चांगलीच वाढली आहे. हा चित्रपट राजकीय ॲक्शन, ड्रामा अशा खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे. त्यातील चमकदार स्टार कास्ट चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवते. टीझरनंतर आता ‘दुआ’ चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या चित्रपटातील पहिलं ‘दुआ’ हे गाणं देशाची निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या सर्वांसाठी एक सुंदर आदरांजली आहे. त्यातील स्टारकास्ट चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवते.

Malini Agrawal : ब्लॉगपासून रील्सपर्यंत मालिनी अग्रवाल ठरतेय द ओजी इन्फ्लुन्सर

रंजक टीझरनंतर आता ‘दुआ’ चित्रपटाचं पहिले गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे एक हृदयस्पर्शी गाणं आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal)आणि शाश्वत सचदेव (Shashwat Sachdev)यांनी संगीतबद्ध केलं आहे. शाश्वत यांनी या गाण्याचं संगीतही दिलं आहे. गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत, तर चित्रपटात महिलेचा आवाज प्रियांशी नायडू (Priyanshi Naidu)यांनी दिला आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दुआ गाण्याबद्दल यामीनं सांगितलं की, जेव्हा मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा मी खूप भावूक झाले होते. गाण्याचे बोल इतके दमदार आहेत की, ते तुमच्या हृदयाला स्पर्श करतात. शिवाय, काश्मीरमधील अतिशय सुंदर भागात याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

‘आत्ताचे लवंडे कुठेही जातील त्याचा पत्ता नाही’; आघाडीत जाणार का? विचारताच ठाकरे कडाडले

या गाण्याबद्दल दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे सांगतात की, आम्हाला नेहमीच देशाच्या भावनांशी जोडलेलं गाणं बनवायचं होतं. अखंड भारतात देशभक्ती जागृत करणाऱ्या गोष्टी कशाही विकसित झाल्या तरीही त्या कधीही बदलत नाही, अशी भावना असावी अशी आमची इच्छा आहे.

दुआ गाण्याबद्दल गायक जुबिन नौटियाल म्हणतो की, मला वैयक्तिकरित्या हे गाणं गाताना खूप आनंद झाला. मला विश्वास आहे की या गाण्यात इतकी ताकद आहे की, ते माझ्यासारख्या प्रत्येक भारतीयांच्या भावना जागृत करेल. या गाण्याचे हृदयस्पर्शी बोल आणि मधुर संगीत गाण्यात एक आध्यात्मिक गुणवत्ता आणते. हे गाणे सर्व संगीत प्रेमींसाठी आहे. शिवाय, देशासाठी गाण्याचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे.

हे गाणं निश्चितच आपल्या देशाप्रती असलेल्या प्रेमात एकतेची आणि अभिमानाची भावना निर्माण करेल. हे गाणं आता सारेगामा म्युझिक यूट्यूब चॅनल आणि सर्व प्रमुख ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us