Download App

Toxic Title Teaser: हातात बंदूक अन् तोंडात सिगारेट; यशच्या ‘टॉक्सिक’चा टायटल टीझर आऊट

Toxic Title Teaser: ‘केजीएफ’ फेम अभिनेता यश (Yash ) याला या चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ (Rocky Bhai) या त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. त्याची एक जळक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आता आगामी सिनेमाचे नाव ‘टॉक्सिक’ (Toxic Movie) असे आहे. निर्मात्यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर करुन त्याच्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. आणि रिलीज डेटही सांगितलं आहे.


व्हिडिओमध्ये यशचा दमदार लूकमध्ये

यशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, यामध्ये अर्धे जळालेले पत्ते दिसत आहेत. आणि बॅकग्राऊंडला एक आकर्षक धून ऐकू येत आहे. यशच्या दमदार लूकची थोडीशी झलक पाहता मिळाली आहे. व्हिडिओमध्ये यश काउबॉय लूकमध्ये दिसत आहे. तो सिगारेट ओढताना दिसत आहे आणि त्याच्या एका हातात मोठी बंदूकही दिसत आहे. ‘टॉक्सिक’चा टायटल टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चाहत्यांना रिलीजची प्रतीक्षा करावी लागेल

यशचा हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याचे दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतू मोहनदास आहेत, जे लायर्स डायस आणि मूथॉन सारखे चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. KVN प्रोडक्शन हाऊस यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे. मात्र, स्टारकास्टबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Jhimma 2: बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना ‘झिम्मा 2’ची टक्कर

‘KGF 2’ ने करोडोंची कमाई केली 

यश शेवटचा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या KGF Chapter 2 या चित्रपटात दिसला होता. केवळ 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला होता. भारतात ‘KGF 2’ ची कमाई 859 कोटी रुपये होती आणि जगभरात त्याचे एकूण 1215 कोटींचा गल्ला जमावला होता. या चित्रपटात संजय दत्तने खलनायकाची भूमिका साकारली होती.

Tags

follow us