Yash Raj Films : भारतातील प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्मने एक मोठा निर्णय घेतला असून यशराज फिल्मसने आपले कास्टिंग अॅप (YRF casting App) लाँच केले आहे. या अॅपचा फायदा नवोदित कलाकारांना होणार आहे. अॅपच्या माध्यमातून यशराज पर्यंत इच्छुक कलाकारांना पोहचता येणार आहे.
यशराजने फिल्मसने दिलेल्या माहितीनुसार, YRF कास्टिंग अॅप (YRF Casting App) सुरू करण्यात आले आहे. इच्छुकांना ॲपमध्येच त्यांचे प्रोफाइल रजिस्टर करता येणार आहे. यशराज फिल्म्सद्वारे निर्मिती होणारे चित्रपट आणि इतर स्ट्रिमिंगशी संबंधित सर्व ऑडिशन्सची माहिती मिळू शकणार आहे. त्याशिवाय हे अॅप इच्छुक कलाकारांसाठी नजीकच्या भविष्यात थेट YRF कडे ऑडिशन सबमिट करण्याचा ऑनलाईन पर्याय असणार आहे.
यशराज फिल्म्स हे अॅप लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण बनावट YRF कास्टिंग अकाऊंट्समुळे उद्भवलेल्या समस्या या YRF अॅपमुळे कमी होती. बनावट कास्टिंग कॉल्समुळे बऱ्याच वेळा कलाकारांची दिशाभूल होते. YRF अॅपमुळे कलाकार त्यांचे ऑडिशन आता थेट अॅपवर अपलोड करु शकतात.
YRF कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा ही YRF प्रोजेक्ट्समध्ये लीड म्हणून लॉन्च करण्यात येणाऱ्या लोकांची निवड करणे आणि त्यांचे प्रशिक्षण घेण्याचं काम करणार आहे. शानू शर्माने “एक था टायगर,” “गुंडे,” “सुलतान,” “टायगर 3,” “पठान”, “हिचकी,” “दम लगा के हैशा,” “मर्दानी” यासारख्या YRFच्या हिट चित्रपटांच्या टीममध्ये काम केलं आहे. यावर बोलताना ते म्हणाले, YRF कास्टिंग ॲप हे इच्छुक कलाकारांना कंपनी करत असलेल्या प्रकल्पांसाठी थेट YRF पर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रगतीशील पाऊल आहे. आम्हाला खात्री आहे की जगभरात असंख्य, तेजस्वी अभिनेते शोधण्याची वाट पाहत आहेत. ही त्यांची आयुष्यभराची संधी असू शकते, असं शानू म्हणाले आहेत.