Prajakata Mali : ‘तुम्ही एकटे नाही…’ प्राजक्ताची सिंगल तरूणांना साद

मुंबई : लाखो तरूणांची क्रश आणि नेहमीच आपल्या सुपर हॉट लूकमुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडीयावर खूपच सक्रिय असते. आता प्राजक्ता पुन्हा चर्चेत आलीय त्याचं कारण म्हणजे, तिने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट. View this post on Instagram A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official) या पोस्टमध्ये प्राजक्ताने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये […]

Prajakata Malai

Prajakata Malai

मुंबई : लाखो तरूणांची क्रश आणि नेहमीच आपल्या सुपर हॉट लूकमुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडीयावर खूपच सक्रिय असते. आता प्राजक्ता पुन्हा चर्चेत आलीय त्याचं कारण म्हणजे, तिने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट.

या पोस्टमध्ये प्राजक्ताने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटो पोस्ट केले आहेत. तर या फोटोंना तिने दिलेले कॅप्शन चांगलेच चर्चेत आले आहे. या कॅप्शनमध्ये प्राजक्ताने लिहिले आहे की, ‘तुमचा स्वतःचा व्हॅलेंटाईन तुम्हीच व्हा; सुरू राहू द्या 🤪.(अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य. तुम्ही एकटे नाही.., मी ही तुमच्यात सहभागी आहे..😅).या स्वातंत्र्यावर प्रेम करा. ☺️ असो, मित्रांनो… प्रेम व्हा, प्रेम पसरवा. कारण प्रेम ही एकमेव गोष्ट आहे ज्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे.’

त्यामुळे प्राजक्ता माळीची ही इन्स्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. अखंड सिंगल तरूणांना जणू तिने या पोस्टमधून आधारच दिला आहे. त्यामुळे सिंगल तरूणांना हायसे वाटत आहे. आपण एकटेच नाही तर आपली क्रश प्राजक्ता माळी देखील सिंगल आहे. तरूणांनी या पोस्टवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

प्राजक्ता माळीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ लूक पाहिलात का

तरुणांनी प्राजक्ताचं अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सहर्ष स्वागत केलंय. तर एक जण तिला म्हणतो की, चल मग मिळून. बाहेर पडू….अशा अफलातून कमेंट केल्या आहे. आता लक्ष आहे ते या कमेंट प्राजक्ता माळी काय म्हणते याकडे.

Exit mobile version