झी5ने सादर केला नव्या रूपातील प्लॅटफॉर्म अनुभव, प्रीमियम इंग्लिश कंटेंट आणि नव्या रूपातील एव्हीओडी सेवा ‘फ्री5’

कंटेंटच्या वाढत्या पर्यायांना आणखी बळ देत झी5ने आतापर्यंतच्या सर्वांत महत्त्वाच्या बदलांपैकी एक बदल सादर केला आहे.

Untitled Design   2026 09 10T170848.367

Untitled Design 2026 09 10T170848.367

ZEE5 unveils its revamped platform : प्रेक्षकांना पूर्वीपेक्षा अधिक मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध होत असताना, मनोरंजन शोधण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा अनुभव झी5कडून नव्याने घडवण्यात येत आहे. कंटेंटच्या वाढत्या पर्यायांना आणखी बळ देत झी5ने आतापर्यंतच्या सर्वांत महत्त्वाच्या बदलांपैकी एक बदल सादर केला आहे. मोबाइल आणि कनेक्टेड टीव्हीवरील अनुभव पूर्णपणे नव्या आणि दमदार रूपात सादर करण्यात आला असून, अधिक स्मार्ट पर्सनलायझेशन, एआयच्या मदतीने कंटेंट शोधण्याची सुविधा, अधिक आकर्षक व्हिज्युअल नॅव्हिगेशन आणि वेगवेगळ्या स्क्रीनवर सहजपणे वापरता येणारा अनुभव ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.

प्रेक्षकांच्या कंटेंट पाहण्याच्या सवयी लक्षात घेऊन नव्या झी5वर प्रीमियम एंटरटेनमेंट, फ्री5, किड्झी, टीव्ही आणि स्पोर्ट्स अशा पाच स्वतंत्र विभागांमध्ये कंटेंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या आवडीचा कंटेंट शोधणे अधिक सहज, आकर्षक आणि सोपे होणार आहे. भारतातील प्रेक्षकांच्या कंटेंट पाहण्याच्या सवयी बदलत आहेत आणि त्यानुसार मनोरंजन शोधण्याचा अनुभवही बदलत आहे. पर्सनलायझेशन हा घटक नव्या अनुभवाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार सर्वाधिक योग्य कंटेंट सहज शोधता येणार आहे.

त्यासोबतच एआय सुविधेमुळे प्लॅटफॉर्मवर कंटेंट अधिक स्मार्ट पद्धतीने शोधता येणार असून, त्याचा वापरही अधिक सहज होणार आहे. मोबाइलसोबतच कनेक्टेड डिव्हाइसवर मनोरंजन पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढत असल्यामुळे छोट्या आणि मोठ्या स्क्रीनदरम्यान सहजपणे वापरता येईल अशा प्रकारे हा नवा अनुभव तयार करण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या सोयीसाठी पुढील पिढीतील एआयवर आधारित कस्टमर सपोर्ट असिस्टंटची सुविधाही देण्यात आली आहे. सबस्क्रिप्शन, प्लेबॅक, ॲक्सेस, कंटेंट आणि डिव्हाइसशी संबंधित समस्यांवर या सुविधेच्या माध्यमातून अधिक स्मार्ट पद्धतीने आणि जवळपास त्वरित तोडगा मिळू शकणार आहे.

या सुविधांसोबतच डेटा प्रायव्हसी अधिक मजबूत करण्यासाठीही झी5कडून प्रगत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी या क्षेत्रातील सर्वोत्तम आणि आघाडीच्या सुरक्षा उपायांचा आधार घेण्यात आला आहे. या सर्व नव्या सुविधा एकत्रितपणे अधिक वेगवान, स्मार्ट आणि सहज मनोरंजन अनुभवाचा नवा मापदंड निर्माण करतात. नवा अनुभव तयार करताना भारतातील प्रेक्षक मनोरंजन कसे पाहतात, कंटेंट कसा शोधतात आणि त्याचा कशा प्रकारे आनंद घेतात, हे समजून घेण्यासाठी झी5ने अधिक सखोल अभ्यास केला.

पुरावे माझ्याकडे, मग सरकार कारवाई का करत नाही? विवेक भीमनवारांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवार आक्रमक

सध्याच्या ॲपबाबत मिळालेला अभिप्राय, विविध बाजारपेठांमधील ग्राहकांचा अभ्यास आणि फोकस ग्रुपमधील चर्चा यांच्या आधारे मोबाइल आणि कनेक्टेड टीव्हीवर प्रेक्षकांचा कंटेंट पाहण्याचा संपूर्ण प्रवास समजून घेण्यात आला. मोठ्या स्क्रीनवरील समृद्ध आणि गुंतवून ठेवणाऱ्या अनुभवाशी तडजोड न करता अधिक सोपा आणि सहज वापरता येणारा अनुभव देण्याची गरज या संशोधनातून अधोरेखित झाली. या निष्कर्षांच्या आधारे प्लॅटफॉर्मची नव्याने रचना करण्यात आली. तसेच लॉन्चपूर्वी प्लॅटफॉर्मच्या प्रत्येक बाबीची काटेकोर तपासणी करून त्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी व्यापक बगॅथॉन्स घेण्यात आले.

यामध्ये प्रॉडक्ट, इंजिनीअरिंग, क्वालिटी ॲश्युरन्स आणि डिझाइन क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्रितपणे काम केले. गेल्या तिमाहीत झी5ने आपल्या विविध प्रकारच्या कंटेंटमध्ये मोठी भर घातली आहे. सर्वप्रथम फिफा वर्ल्ड कप २०२६™ आणि २०३० या जागतिक क्रीडा स्पर्धांचे हक्क मिळवण्यात आले आणि त्यानंतर सात भाषांमधील कंटेंटची मोठी श्रेणी सादर करण्यात आली. याच वाटचालीला पुढे नेत झी5 आता प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रीमियम इंग्लिश मनोरंजनाची खास श्रेणी सादर करत आहे. यामध्ये जगभरातील दर्जेदार चित्रपटांसोबतच हॉलिवूडमधील काही आघाडीच्या कलाकारांच्या चित्रपटांचा समावेश आहे.

पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्स आणि लायन्सगेट प्ले यांच्यासोबत करण्यात आलेल्या धोरणात्मक सहकार्याच्या माध्यमातून अनेक चित्रपटांचे डिजिटल प्रीमियर झी5वर होणार आहेत. यामध्ये बॉब ओडेनकर्क, हेन्री विंकलर आणि लीना हेडी यांचा ‘नॉर्मल’; सेथ रोगन, पेनेलोपे क्रूझ, एडवर्ड नॉर्टन आणि ऑलिव्हिया वाइल्ड यांचा ‘द इन्व्हाइट’; अँजेलिना जोली आणि जेसन सीगल यांचा ‘ॲन्शस पीपल’; सेथ रोगन आणि ॲना केंड्रिक यांचा ‘बेबीज’; ज्युड लॉ यांचा ‘द विझार्ड ऑफ द क्रेमलिन’; ग्लेन पॉवेल आणि मार्गारेट क्वॉली यांचा ‘हाऊ टू मेक अ किलिंग’; डॉमिनिक सेसा यांचा ‘टोनी’; तसेच ॲडम ड्रायव्हर, स्कारलेट जोहान्सन आणि माइल्स टेलर यांचा ‘पेपर टायगर’ यांचा समावेश आहे.

आघाडीचे कलाकार, जगभरातील विविध कथा आणि प्रीमियम चित्रपटांचा एवढा व्यापक संग्रह झी5च्या इंग्लिश मनोरंजनाच्या वाटचालीतील एका नव्या आणि महत्त्वाच्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. त्याच वेळी, फ्री5देखील नव्या दमदार ओळखीसह पूर्णपणे नव्या रूपात सादर करण्यात येत आहे. मनोरंजनाच्या आतापर्यंतच्या सर्वांत व्यापक पर्यायांपैकी एक असलेल्या नव्या फ्री5वर सीरिज, चित्रपट, कोरियन आणि चायनीज ड्रामा, ॲनिमे, बातम्या, मायक्रो ड्रामा आणि क्रिएटर्सचा वैविध्यपूर्ण कंटेंट एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पूर्वीपेक्षा अधिक भाषा, प्रकार, फॉरमॅट आणि वेगवेगळ्या क्रिएटर्सचा कंटेंट उपलब्ध असल्यामुळे नव्या फ्री5वर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे विशाल विश्व सादर करण्यात आले आहे आणि त्याचा आनंदही घेता येणार आहे. विशेष म्हणजे, हे सर्व कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल. फ्री5च्या या विस्तारित स्वरूपामुळे जाहिरातदारांनाही झी5वरील विविध प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यांच्या गरजांनुसार जाहिराती सादर करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. झी5 इंडियाचे बिझनेस हेड आणि एआय अँड इनोव्हेशनचे प्रमुख तेजकरण सिंग बजाज म्हणाले, “झी5च्या पुढील टप्प्यात, प्रेक्षकांना मनोरंजनाचा कंटेंट अधिक सहजपणे शोधता यावा, त्यांच्या आवडीनुसार अधिक योग्य कंटेंट मिळावा आणि त्यांना अधिक चांगला अनुभव मिळावा यावर भर देण्यात आला आहे.

‘ज्या विभागाचे मंत्री, त्यांनाच योजनेची कल्पना नाही’; निलेश लंकेंची राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका

मोबाइल आणि कनेक्टेड टीव्हीवरील अनुभवाची नव्याने रचना करण्यात आली असून, त्यामध्ये अधिक स्मार्ट पर्सनलायझेशन, एआयचा अधिक व्यापक वापर आणि कंटेंट अधिक सहजपणे शोधण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर आधीपासूनच सात भाषांमधील प्रीमियम चित्रपट आणि सीरिज, विविध प्रकारचा टेलिव्हिजन कंटेंट, स्पोर्ट्स, लहान मुलांसाठीचे मनोरंजन, लाइव्ह टीव्ही आणि बातम्या उपलब्ध आहेत. आता त्यामध्ये जगभरातील चित्रपट भारतीय प्रेक्षकांपर्यंत आणणाऱ्या इंग्लिश कंटेंटच्या नव्या श्रेणीची भर घालण्यात येत आहे. त्यासोबतच अधिक भाषा, विविध प्रकारचा कंटेंट आणि क्रिएटर्सच्या कंटेंटचा समावेश असलेले फ्री5ही नव्या रूपात सादर करण्यात येत आहे.

या व्यापक पर्यायांमुळे जाहिरातदारांना विविध भाषा, कंटेंटचे प्रकार आणि प्रेक्षकांच्या कंटेंट पाहण्याच्या वेगवेगळ्या प्रसंगांनुसार विशिष्ट प्रेक्षक गटांशी जोडून घेण्यासाठी अधिक व्यापक संधी उपलब्ध होणार आहेत. प्लॅटफॉर्म आणि कंटेंटमध्ये करण्यात आलेल्या या बदलांमुळे प्रेक्षकांना अधिक पर्याय, अधिक वैविध्य आणि आपल्या आवडीचा कंटेंट शोधण्याचा अधिक सोपा मार्ग उपलब्ध होणार आहे.” झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर प्रमोद प्रकाश म्हणाले, “स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वापरताना प्रेक्षक अनेक छोट्या छोट्या गोष्टींशी संवाद साधतात आणि यातील प्रत्येक गोष्टीवरून त्यांचा त्या सेवेबद्दलचा अनुभव घडत असतो. त्यामुळे केवळ स्वतंत्र सुविधांचा विचार न करता संपूर्ण अनुभवाचा नव्याने विचार करण्यावर आम्ही भर दिला.

प्रेक्षकांसाठी हा अनुभव कुठे अधिक सहज, अधिक वेगवान आणि कमी किचकट करता येईल, याचा विचार करण्यात आला. याच्या केंद्रस्थानी सहज समजणारे आणि वापरण्यास सोपे ॲप आहे, ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येक पिढीला आपल्या आवडीचे मनोरंजन सहज पाहता येते. या नव्या रूपामागे एक साधा विचार आहे : तंत्रज्ञानामुळे वापरातील अडथळे सहजपणे दूर व्हायला हवेत आणि मनोरंजनाला केंद्रस्थानी राहू द्यायला हवे. प्रेक्षक आता वेगवेगळ्या डिव्हाइसवर, वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये आणि वेगवेगळ्या परिस्थितीत कंटेंट पाहत आहेत. त्यामुळे भविष्यात प्रेक्षक ज्या प्रकारे मनोरंजन पाहतील, त्यासाठी झी5ला अधिक अनुकूल, विश्वासार्ह आणि सज्ज बनवण्यात येत आहे.”

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर प्रमोद प्रकाश म्हणाले, “स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वापरताना प्रेक्षक अनेक छोट्या छोट्या सुविधांचा वापर करत असतात आणि यातील प्रत्येक गोष्टीवरून त्यांचा त्या सेवेबद्दलचा अनुभव घडत असतो. त्यामुळे केवळ स्वतंत्र सुविधांचा विचार न करता संपूर्ण अनुभवाचा नव्याने विचार करण्यावर आम्ही भर दिला. प्रेक्षकांसाठी हा अनुभव कुठे अधिक सहज, अधिक वेगवान आणि कमी किचकट करता येईल, याचा विचार करण्यात आला. याच्या केंद्रस्थानी सहज समजणारे आणि वापरण्यास सोपे ॲप आहे, ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येक पिढीला आपल्या आवडीचे मनोरंजन सहज पाहता येते. या नव्या रूपामागे एक साधा विचार आहे : तंत्रज्ञानामुळे वापरातील अडथळे सहजपणे दूर व्हायला हवेत आणि मनोरंजनाला केंद्रस्थानी राहू द्यायला हवे. प्रेक्षक आता वेगवेगळ्या डिव्हाइसवर, वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये आणि वेगवेगळ्या परिस्थितीत कंटेंट पाहत आहेत. त्यामुळे भविष्यात प्रेक्षक ज्या प्रकारे मनोरंजन पाहतील, त्यासाठी झी5ला अधिक अनुकूल, विश्वासार्ह आणि सज्ज करण्यात येत आहे.”

Exit mobile version