Download App

ZHZB Box Office Collection: विकी अन् साराच्या ‘जरा हटके जरा बचके’चा बॉक्स ऑफिसवर डंका; जाणून घ्या कलेक्शन

Zara Hatke Zara Bachke Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान सध्या ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली असल्याचे दिसून येत आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला आहे.


‘द केरळ स्टोरी’, चौक, आणि ‘रावरंभा’यासारखे हिंदी-मराठी सिनेमे तिकीट बारवर मोठ्या प्रमाणात गर्दी खेचली जात आहे. पण तरी देखील विकी-कौशल आणि सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ हा हलका-फुलका सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी झाला असल्याचे दिसून येत आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी (ओपनिंग डे) 5.49 कोटींची कमाई केली होती.

तर दुसऱ्या दिवशी 7.20 कोटी, तिसऱ्या दिवशी 9.90 कोटी आणि चौथ्या दिवशी 4.14 कोटींची कमाई केली आहे. विकेंडला ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाने चांगलाच मोठा गल्ला कमावला आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 26.73 कोटींचा गल्ला कमावला आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाची घौडदौड बघता लवकरच हा सिनेमा 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

‘जरा हटके जरा बचके’ हा रोमँटिक विनोदी सिनेमा आहे. एका जोडप्याची गोष्ट या सिनेमामध्ये दाखवण्यात आली आहे. सिनेमामध्ये विकी कौशल कपिलच्या तर सारा सौम्याच्या भूमिकेमध्ये प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील ट्विस्ट चाहचे चांगलच मनोरंजन करत आहेत. मॅड्रॉक फिल्म्स आणि जियो स्टुडिओच्या बॅनर अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमामध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत. विकी-सारासह ईनामउलहक, नीरज सूद, राकेश बेदी, शारिब हाशमी, सुष्मिता मुखर्जी हे कलाकार देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

Tags

follow us