19वा MIFF 2026 : वेव्ह्ज डॉक बाजार पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या आवृत्तीतील मानकरी प्रकल्पांचा गौरव
19th MIFF 2026 महोत्सवात स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या वेव्ह्ज डॉक बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचा पुरस्कार सोहळा पार पडला.
shruti letsupp
MIFF 2026 Inaugrate
19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF 2026) स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या वेव्ह्ज डॉक बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.
माहितीपट, लघुपट आणि नॉन-फिक्शन चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत पोस्ट-प्रॉडक्शन सुविधा, वितरण सहाय्य आणि रोख अनुदान अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
प्रसाद लॅब्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (IICT), रिबॉर्न इंडिया फिल्म्स आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) यांच्या सहकार्याने हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रसाद लॅब्स पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार
प्रसाद लॅब्सचे महाव्यवस्थापक नितीन पिंगळे यांच्या हस्ते करिश्मा राव यांच्या ‘ऑन अ गुड नोट’ या माहितीपटाला चेन्नईतील प्रसाद लॅब्समध्ये 50 तासांपर्यंत मोफत 4K DI सेवांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच इंद्रजीत मोरे यांच्या ‘इट टेक्स अ व्हिलेज’ या फीचर डॉक्युमेंटरीला 50 तासांच्या DI सेवांवर 50 टक्के सवलतीचा पुरस्कार देण्यात आला.
IICT पोस्ट-प्रॉडक्शन पुरस्कार
IICT चे अकादमिक संचालक सतीश नारायणन यांनी नंदन सक्सेना आणि कविता बहल यांच्या ‘अदियू दिल्ली’ या माहितीपटाला 50 तासांच्या 4K DI सेवांवर 50 टक्के सवलत देणारा पुरस्कार प्रदान केला.
याच श्रेणीत सान्या आनंद यांच्या ‘दो चार दिन’ या माहितीपटालाही समान स्वरूपाचा पुरस्कार मिळाला.
रिबॉर्न इंडिया फिल्म्स वितरण पुरस्कार
करिश्मा राव यांच्या ‘ऑन अ गुड नोट’ या माहितीपटाला रिबॉर्न इंडिया फिल्म्सतर्फे विशेष वितरण पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्काराअंतर्गत चित्रपटाला 10 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी सुमारे 7 लाख रुपयांच्या वितरण सहाय्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
NFDC रोख अनुदान पुरस्कार
NFDC चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांच्या हस्ते तीन चित्रपट प्रकल्पांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे रोख अनुदान देण्यात आले.
अशोक मीना – ‘कुंचोक अँड हिज मेनी मून्स’
मधुरिमा मैती – ‘द गर्ल बिनीथ द सन’
अस्मिता पाल – ‘टुक्रो टुक्रो पृथ्वी’
या पुरस्कार सोहळ्यात प्रकाश मगदूम, नितीन पिंगळे, सतीश नारायणन तसेच राहुल आणि रोहित अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्यांसोबतचा सामूहिक छायाचित्र सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला. वेव्ह्ज डॉक बाजारच्या या उपक्रमामुळे देशभरातील स्वतंत्र आणि आशयघन चित्रपटनिर्मितीला नवी चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.