स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री काजोल यांना सन्मानित करण्यात आले.
2 / 6
2024 चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात आला
3 / 6
2024 चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना देण्यात आला तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
4 / 6
राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले.
5 / 6
या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025 या पुरस्काराने राजदूत, युनोस्कोतील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.
6 / 6
हे सर्व पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, महसूल व वने अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.