विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुढी उभारली.
शासकीय निवासस्थान देवगिरी इथं सपत्नीक गुढ उभारत गुढीची पूजा केलीय.
यावेळी अजित पवार यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या.
एकजूट होऊन समृद्ध, सुखी आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया, या शब्दांत त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.
सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी, चैतन्य, उत्साह, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना पवार यांनी केलीय.