Download App

जय सिया राम! 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान, PM मोदींच्या हस्ते पूजा, पाहा फोटो

1 / 7

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना महापूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

2 / 7

तब्बल पाच शतकांचा वनवास संपवून श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याने संपूर्ण देशात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

3 / 7

या पुजेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मोदी हे क्रीम कलरचा कुर्ता, पांढरं धोतर आणि गळ्यामध्ये पांढरा पंचा परिधान करून आले होते, तसेच त्यांनी प्रभू श्रीरामांसाठी चांदीचं छत्र ही खास भेट आणली होती.

4 / 7

मोदी यांनी आचमन करून पूजेचा संकल्प सोडला. मुख्य पुजारांसह इतर सर्व पुजाऱ्यांच्या कडून मंत्रोच्चारांच्या घोषात प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला. यामध्ये अगोदर सर्व भगवान गणेशांची पूजा करून करण्यात आली.

5 / 7

कोणत्याही पूजेला गणेश पूजनाने सुरवात करणे शास्त्रात महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर मंदीरात विराजमान असलेल्या श्रीरामांच्या मोठ्या मूर्तीसह जुन्या मूर्तीची देखील गाभाऱ्यामध्ये आणून विधिवत पूजा संपन्न झाली.

6 / 7

या पूजेदरम्यानच दुपारी बरोबर बारा वाजून 29 मिनिट आणि आठ सेकंद ही वेळ प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी महत्त्वाची होती कारण त्यावेळी अभिजीत मुहूर्त होता आणि हाच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात साजला गेला.

7 / 7

पंतप्रधान मोदींसह सर्व मान्यवरांकडून प्रभू श्रीरामांचे चरणी पुष्प आणि अक्षता अर्पण करण्यात आल्या तसेच महापूजेनंतर प्रभू श्रीरामांची महाआरती पार पडली. त्यानंतर पुजाऱ्यांकडून पूजा संपन्न झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

follow us