जम्मू आणि काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, रियासी जिल्ह्यातील कटरा येथे असलेल्या माता वैष्णो देवीच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर असलेल्या अर्धकुवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ पावसानंतर भूस्खलन झाले.
माहितीनुसार, काही लोक यात जखमी झाले आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु असल्याची माहिती श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्धकुमवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलन झाले आहे आणि बचाव कार्य सुरू आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे त्रिकुटा टेकडीवर ही भूस्खलन झाली आहे.
तर दुसरीकडे माता वैष्णोदेवी यात्रा सध्या थांबविण्यात आली आहे आहे. अर्धकुंभरी ते भवन हा मार्ग बंद करण्यात आला आहे. खालच्या ट्रॅकवरून भाविकांची हालचाल देखील प्रतिबंधित करण्यात आली आहे.