Legislat ive Council साठी विधान भवन, मुंबई येथे विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
shruti letsupp
1
विधान भवन, मुंबई येथे विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी मविआ कडून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार , भाई जगताप,अरविंद सावंत ,सचिन अहीर सुनील प्रभू उपस्थित होते.
विधान परिषदेच्या माजी उपसभापती आणि शिवसेना महिला नेत्या डॉ. निलम गोऱ्हे आणि प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे आमदार मुरजी पटेल आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा उमेदवार सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव आणि प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केले
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री जयकुमार गोरे, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करत पक्षातील सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कुणाला संधी मिळणार याबाबत राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते.
तर दुसरीकडे झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट व्हायरल होत आहे.