Download App

Chatrapati Shivaji Maharaj जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे क्षणचित्रे

  • Written By: Last Updated:
1 / 6

Chatrapati Shivaji Maharaj : आज (सोमवार, 19 फेब्रुवारी) ला अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांची ३९४ वी जयंती आहे.

2 / 6

शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shind) यांच्या उपस्थित हा शिवजयंती सोहळा साजरा झाला.

3 / 6

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा झाला.

4 / 6

या उत्सवानिमित्त शिवजन्मस्थान, शिवकुंज, शिवदेवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गडाचे दरवाजे फुलांच्या माळांनी सजवले होते. सकाळी शिवाई देवीची शासकीय महापूजा करण्यात आली.

5 / 6

दरम्यान, शिवजयंतीसाठी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवभक्त शिवनेरी गडावर दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने संपूर्ण गडावर जयघोष झाला.

6 / 6

गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली होती. उत्सवासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आली होती.

follow us