


टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो दुसऱ्या डावातही कायम राहिला. भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 444 धावांचे लक्ष्य होते, मात्र एकाही फलंदाजाला पन्नास धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याचवेळी भारताचा डाव अवघ्या 234 धावांवर आटोपला. अशा प्रकारे कांगारूंनी सामना 209 ने जिंकला.

