विनाशकारी भूकंपामुळे म्यानमार थायलंड या राष्ट्रांमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
या भूकंपामध्ये म्यानमारमध्ये 1 हजार 644 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. परंतु कोसळलेल्या इमारतींचा विध्वंस पाहता हा आकडा दहा हजारापर्यंत जाऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी म्यानमार आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला होता. परंतु संकटाच्या काळात भारत म्यानमारसाठी धावून आला आहे. म्यानमारमधील बचाव कार्यासाठी भारत ऑपरेशन ब्रह्मा राबवत आहे.
या ऑपरेशनमध्ये 15 टन साहित्य, एनडीआरएफची 80 जणांची एक टीम आणि फील्ड हॉस्टिपल मदतीसाठी पाठविले आहे. फील्ड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व नर्सेस असे 118 जण असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत हा म्यानमारचा मित्र आहे. त्यामुळे कठिण परिस्थिती आम्ही या देशाबरोबर आहोत. त्यांना आवश्यक सर्व मदत केली जाईल.