Download App

Devendra Fadnavis मनसोक्त गप्पात हरवले, ताज हॉटेलात रंगली कष्टकऱ्यांसोबत मैफील, पाहा फोटो

  • Written By: Last Updated:
1 / 9

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून वृद्ध, कष्टकरी महिला आणि पुरुषांना मुंबईची सफर घडविण्यात आली.

2 / 9

या उपक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

3 / 9

‘या लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद मला अधिक काम करण्याची उर्जा देत राहील’, असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर केले आहे.

4 / 9

देवेंद्र फडणवीस म्हणतात, ”तुम्ही म्हणालात, ‘मुंबई तर पाहिलीच, पण तुम्हाला फक्त टीव्ही आणि पेपरात पाहतो, तुमची भेट होईल, याची स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती!

5 / 9

पण खरं सांगू मला तुम्हाला भेटून अधिक आनंद झाला, आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली झाली.

6 / 9

या उपक्रमाचे कौतुक करताना फडणवीस म्हणतात, ”आयुष्यात कधीही घराच्या बाहेर न पडलेल्या या बांधवांना मुंबई दाखण्याचा हा उपक्रम अतिशय सुंदर आहे.

7 / 9

कुणी वॉचमनचे काम करतो, तर कुणी शेतीत काम, भाजीपाला विक्री, रांगोळी व्यवसाय, धुणीभांडी अशी कामे करणारे आहेत. त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारताना गावात हरविल्यासारखे झाले.

8 / 9

‘समुद्र पाहिला…. एकेक करीत प्रत्येक जण आपले अनुभव कथन करीत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला अधिक काळ काम करण्याची ऊर्जा देत राहील.

9 / 9

हा उपक्रम आयोजित करणारे महेश पवार आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन!,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Tags

follow us