मोदींशी गळाभेट ते एकाच गाडीतून प्रवास; पुतीन यांच्या भारत दौऱ्याचे खास फोटो नक्की पाहा
Putin's India visit हे गुरूवारी संध्याकाळी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतीन हे 30 तास दौऱ्यादरम्यान भारतात असणार आहेत.
shruti letsupp
Putin's India visit
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) हे गुरूवारी संध्याकाळी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
पुतीन हे 30 तास दौऱ्यादरम्यान भारतात असणार आहेत.
पुतीन हे या दौऱ्यात 25 करारांवर सह्या करण्याची शक्यता आहे.
पुतीन यांच्या या दौऱ्यामुळे नक्कीच दोन्ही देशांतील संबंध अधिक चांगले होतील.
त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर अंतराळापासून ते व्यापारापर्यंतची दोन्ही देशांची ताकद वाढणार आहे.
पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार ते 5 डिसेंबरला सकाळी 11:50 वाजता हैद्राबाद हाऊसमध्ये (Hydrabad House) पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतील, जिथं दोन्ही देशांचे नेते 23 व्या भारत-रशिया शिखर परिषदेचा भाग असतील.
भारत आणि रशिया हे दोन्ही देश एकमेकांचे सर्वोत्तम मित्र म्हणून जगभरात सर्वश्रृत आहेत.
पंतप्रधान मोदींनी (PM Modi) 2014 मध्ये पहिल्यांदा पुतिन यांना सांगितले होते की, भारतातील प्रत्येक मुलाला माहित आहे की, रशिया आमचा सर्वात चांगला मित्र आहे.