विविध देशातील पाहुण्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापित श्री गणेशांचे मनोभावे दर्शन घेतले.
तब्बल 30 हून अधिक देशातील विदेशी पाहुण्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
गणपती दर्शनासाठी आलेल्या पाहुण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. त्यांच्याशी दिलखुलास संवादही साधला.
स्वागत आणि भक्तीपूर्ण, उत्साही वातावरणाबाबत विदेशी पाहुण्यांनी आनंद व्यक्त केला.
गणेशाचे मनोभावे दर्शन घेतानाच सर्व विदेशी पाहुणे मंडळींनी गणेश पूजाविधीची आवर्जून माहिती घेतली.