दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम यांचं नाव घेतलं जातं. अनेक हिंदी मराठी सिनेमातून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून छायाने तिच्या कमालीच्या अभिनयाने स्वतःचं वेगळं पण सिद्ध करत अनेक उत्तम प्रोजेक्ट्ससोबत बॉलिवुड गाजवलं.
छाया कदम हे नाव साता समुद्रापार पोहचलं खरं, पण भारतात देखील आज हे नाव तेवढ्याच ताकदीने घेतलं जातंय.
त्यांच्या अभिनयाचं वेगळेपण सगळ्यांना आपसूक मोहून जातंय. छाया ताईंनी आजवर अनेक महत्त्वपूर्ण भूमिका अगदी ताकदीने पार पाडल्या.
नुकतच त्यांनी त्यांचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. त्यामध्ये त्या अत्यंत मनमोहक दिसत आहेत.
रेड गाऊनमध्ये त्यांच्या अदा म्हणजे अगदी एज इज़ जस्ट नंबर असंच म्हणावं लागेल.