अभिनेत्री हिना खान हिला नुकतंच तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालं आहे.
या आजाराला ती धाडसाने तोंड देत असतानाच आता तिच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा पर्व सुरू झालं आहे.
कारण ती आता गेल्या कित्येक वर्षांपासून तिचा बॉयफ्रेंड असलेल्या रॉकी जयस्वाल याच्यासोबत विवाहबद्ध झाली आहे.
तिने तिच्या या विवाहाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हिना खाने रजिस्टर पद्धतीने हा विवाह केला.
तर या लग्नाची माहिती देताना हिना खाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिला आहे की,
दोन वेगळ्या जगातून आम्ही आता आमचं जग निर्माण केलं आहे.
आमच्यातील सगळे मतभेद नष्ट झाले असून आमची ह्रदय जुळली आहेत.
ज्यामुळे एक असं नातं तयार झालं आहे. जे जीवनभर कायम राहील.
आम्ही आमचं घर, आमची स्वप्न आणि आमचे संकट सगळं सगळ्याला एकत्र सामोरे जाऊ.
आज आमचं प्रेम कायदेशीर पद्धतीने बांधलं गेलं आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्या आशीर्वाद पती-पत्नी म्हणून कायम मिळो. असं म्हणत हिना खानेने तिच्या चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली आहे