समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा; पाहा खास फोटो
shakir sayyad
Samruddhi Highway
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे (76 किमी) दरम्यानच्या लोकार्पणाचा सोहळा आज पार पडला.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर कॅबिनेट मंत्री आणि आधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर आज अडीच वर्षांनी या महामार्गातील शेवटच्या टप्प्यात 76 किमी इगतपुरी ते आमणे या रस्त्याचे लोकार्पण झाले.
या प्रकल्पासाठी 61 हजार कोटी रुपयांचा खर्च करुन 701 किमीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे.
या महामार्गासाठी तब्बल 12 कोटी सिमेंट बॅग वापरण्यात आल्या असून स्टीलही मोठ्या प्रमाणात वापरले आहे. 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा उपयोग रस्ता उभारण्यासाठी करण्यात आला आहे.
महायुतीच्या सरकारकरीता आनंदाची गोष्ट आहे. जे स्वप्न आम्ही 2014 नंतर आम्ही पाहिले होते. त्याची पूर्तता आज होत आहे. समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाहीये महाराष्ट्राच्या इकॉनॉमी च कॉरिडॉर आहे. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हा प्रकल्प सुरु असताना अनेकांनी याला विरोध केला होता. संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये आम्हाला या प्रकल्पाला विरोध करा असं सांगितले होते. असं अजित पवार म्हणाले.
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, इंधन बचत होईल, प्रवास वेगवान होईल. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरणास चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
या महामार्गावर 73 पूल आहेत. वन्य जीवांना धोका पोचू नये यासाठी अंडर पास आणि ओव्हर पास बनवले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत समृद्धी महामार्गावर कारने प्रवासाचा आनंद घेतला.
शेवटचा टप्पा 76 किमी आहे. यामध्ये 5 जुळे बोगदे आहेत. 60 डिग्री तापमान झाल्यास आपोआप पाणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यास आपोआप बंद होते. हे सगळे बोगदे एकमेकांना जोडले आहेत. 22 ठिकाणी सुविधा केंद्र असतील.