INDIA Meeting Photo: भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक एकटवले, एका पाठोपाठ दिग्गज नेते मुंबईत…
kabir letsupp
INDIA MEETING
मुंबईत आज आणि उद्या विरोधकांच्या इंडिया आघाडी दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीत काँग्रेससह इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.
आज काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खर्गे हे मुंबईत दाखल झाले. त्यांचे हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वागत केले. यावेळी राहुल गांधीही हजर होते.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मल्लिकार्जून खर्गे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
खा. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील आज मुंबईत आले. विमानतळावर जाऊन कॉंग्रेस नेते अशोक चव्हाणांसह अन्य नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
बैठक सुरू होण्यापूर्वी सोनिया गांधीसह राहुल गांधींनी अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन हात उंचावत कार्यकर्त्यांना अभिवादन केलं.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी मल्लिकार्जून खर्गे यांनी चर्चा केली.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांच्यावर जोरदार टीका केली.