141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सत्रापूर्वी नीता आणि मुकेश अंबानी यांनी IOC अध्यक्ष थॉमस बाख यांचे मुंबईतील अँटिलिया या बंगल्यावर पारंपारिक पद्धतीने स्वागत केले.
2 / 7
IOC चे हे विशेष सत्र 15 ते 17 ऑक्टोबर 2023 दरम्यान मुंबईत होणार आहे. नीता अंबानी या IOC च्या पहिल्या भारतीय खाजगी महिला सदस्य आहेत.
3 / 7
IOC ने भारतात ऑलिम्पिक व्हॅल्यू एज्युकेशन प्रोग्राम (OVEP) च्या यशासाठी रिलायन्स फाऊंडेशनशी करार केला आहे. या करारात ऑलिम्पिक संग्रहालयाचाही समावेश करण्यात येणार आहे.
4 / 7
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनीही मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स (RFYC) फुटबॉल अकादमीला भेट दिली.
5 / 7
अध्यक्ष बाख म्हणाले, खेळांमध्ये तरुणांचे जीवन बदलण्याची क्षमता आहे. रिलायन्स फाऊंडेशनने OVEP अंमलबजावणी भागीदार म्हणून आमच्यात सामील होण्याचे आम्ही स्वागत करतो.
6 / 7
बाख पुढे म्हणाले, ऑलिम्पिक एकतेची भावना व्यक्त करते. OVEP कार्यक्रमाद्वारे, आम्ही सर्व मुले आणि तरुण लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो.
7 / 7
नीता अंबानी म्हणाल्या, “रिलायन्स फाऊंडेशनला OVEP साठी IOC सोबत भागीदारी करण्यात आनंद होत आहे. OVEP खेळ आणि शिक्षण एकत्र आणते.