French Open 2025 Photo : इतिहास घडवला! अल्काराझ-सिनर मैदानात कसे भिडले, पाहा
Rohini Gudaghe
Jannik Sinner Vs Carlos Alcaraz French Open 2025 Tennis Final
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतला पुरुषांच्या एकेरीचा हा अंतिम सामना भन्नाट म्हणावा असाच झाला.
पाचही सेट चुरशीचे झाले. यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझने बाजी मारली.
ही लढत चालली ३२९ मिनिटं. दोन्ही खेळाडूंचं सगळं काही पणाला लागलं होतं.
Image (64)
शेवटच्या सेटमध्ये अल्काराझ आघाडीवर होता. पण सिनरने पुन्हा उचल खाल्ली.
यावेळी गतविजेता अल्काराझचं सामन्यात पुनरागमन झालं. त्यानं तीन मॅच पॉइंट वाचवले. स्वतःलाही वाचवत पुन्हा स्पर्धेत आणलं.
पहिले दोन सेट जिंकणारा सिनर विजेतेपदाकडे दमदारपणे वाटचाल करीत होता. तिसरा सेट अल्काराझने जिंकला आणि चौथ्या सेटला महत्त्व आलं.
पहिले जवळपास तीन तास सामन्यावर बऱ्यापैकी वर्चस्व असलेल्या इटलीच्या यानिक सिनर ह्याच्यावर त्याने बाजी पलटवली.