Japan : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंप, रस्त्यांवर भेगा अन् भयभीत नागरिक; पाहा फोटो
shruti letsupp
Japan
त्यानंतर इशिकावा प्रांतांत 32 हजार 500 घरांची वीज कापण्यात आली आहे. तसेच या भूकंपाचे फोटो समोर यायला सुरूवात झाली आहे.
या फोटोमध्ये दिसत आहे की, रस्त्यांवरती मोठ्या-मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्सुनामीचा परिणामही दिसून येत आहे.
तर सरकारी वृत्तानुसार टोयोमा शहराच्या जवळ 0.8 मीटर उंच त्सुनामीच्या लाटा आल्याची माहिती देण्यात आली आहे.
यादरम्यान न्यूक्लियर प्लांट्सला धोका पोहोचल्याच्या बातम्या देखील येत होत्या. मात्र यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा. परमाणू नियमक प्राधिकरणाने केला आहे.
प्रशासनाने सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याबरोबर नागरिकांना त्वरीत किनारी भाग सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी 28 डिसेंबरला जपानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. जपानच्या कुरिल बेटांवर झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल एवढी होती.