कल्की 2898 AD या चित्रपटाच्या रिलीजच्या अगोदर बुधवारी 19 जूनला एक मोठा इव्हेंट पार पडला. यामध्ये गरोदर असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने देखील हजेरी लावली होती.
2 / 5
या इव्हेंटमध्ये आपलं बेबी बम्प फ्लॉंट करताना दीपिका अत्यंत सुंदर दिसत होती. तिचे या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3 / 5
या फोटोंमध्ये दिसत आहे की, गरोदर दीपिकाला चालताना चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि दक्षिणात्य अभिनेता प्रभास देखील मदत करत आहे.
4 / 5
दरम्यान नाग अश्विन यांच्याकडून दिग्दर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटांमध्ये दीपिकासह प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.
5 / 5
तर हा चित्रपट 27 जूनला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे