Kavyanjali Marathi Serial : काव्याच्या मंगळागौरीसाठी सजल्या साऱ्या जणी! पाहा फोटो
shruti letsupp
Kavyanjali Marathi Serial
सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना म्हटलं की, मंगळागौर आलीच त्यात महिला वर्गाची लगबग, मंगळागौरीचा पुजा, खेळ, जागरण यामुळे चांगलीच रंगत येते.
त्यामुळे सध्या मराठी टीव्ही मालिकांमध्ये देखील या मंगळागौरीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यात कलर्स मराठीवरील मालिका ‘काव्यांजली’ सखी सावली या नव्या मालिकेमध्ये देखील मंगळागौर साजरी करण्यात करण्यात आली.
यावेळी मालिकेतील महिलामंडळांनी नटूनथटून मालिकेची नायिका अंजली हीच्या मंगळागौरीची पुजा केली. मंगळागौरीचे खेळ खेळल्याचं पाहायला मिळालं.
ही मालिका दोन बहिणींच्या नात्यावर आधारित आहे. त्यामध्ये अंजली आणि काव्या अशी या बहणींची नावं आहेत. त्यावरून या मालिकेला ‘काव्यांजली’ असं नाव आहे.
यामध्ये अंजली देवकर हीची भूमिका प्राप्ती रेडकर तर काव्या प्रभुदेसाईची भूमिका ही कश्मीरा कुलकर्णी हीने साकारली आहे.
या दोन बहिणींमध्ये बहिणी-बहिणी पेक्षा आई मुलीप्रमाणे नात आहे. कारण काव्या ही मोठी तर अंजली ही लहाण बहिण आहे. त्यामुळे लहानपणापासूनच अंजली ही काव्याची मानसकन्याच राहिली आहे.
तर काव्या ही प्रभुदेसाईंच्या घरात सून म्हणून गेल्यानंतर अंजलीवर घराची जबाबदारी पडली आहे. अशी या मालिकेची कथा आहे.
काव्यांजली या मालिकेचा मंगळागौर विशेष भाग पाहायला विसरू नका
28-29 ऑगस्ट संध्याकाळी 8 : 30 वा कलर्स मराठी या वाहिनीवर