“आमचा राम राम घ्यावा” भगत सिंग कोश्यारी यांचा राजभवनात शेवटचा दिवस
letsupteam
Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्राचे सर्वाधिक गाजलेले राज्यपाल म्हणता येईल असे भगतसिंह कोश्यारी यांचा आज राजभवनातील शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी ते उत्तराखंडला रवाना होणार आहे.
राज्यपाल पदाच्या आजच्या शेवटच्या दिवशी भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील मुंबादेवी व श्री बाबुलनाथचे दर्शन घेतले.
भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली.
विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हेदेखील संध्याकाळी मुंबईत येणार आहेत. नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी राजभवन येथील दरबार हॉलमध्ये दुपारी 12.40 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सर्व फोटो / राज्यपाल कार्यालय