पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा चंद्रपूर येथे झाली. या सभेतील काही निवडक दृश्ये पाहा...
2 / 10
लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी चंद्रपुरात सभा झाली.
3 / 10
मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणात सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
4 / 10
प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर देखील जोरदार हल्लाबोल केला.
5 / 10
मोदी म्हणाले, काँग्रेस कडू कारले; तर ठाकरेंची शिवसेना नकली, इंडिया आघाडीचा मंत्र 'जहां भी सत्ता पाओ, खूब मलाई खाओ
6 / 10
लोकांचं समर्थन राहिलं नाही. त्यामुळं आता कॉंग्रेसनं वाटा आणि राज्य करा असं धोरण अवलंबलं आहे.
7 / 10
त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
8 / 10
तर चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-एनडीएच्या मेहनती उमेदवारांना विजयी करण्यासाठी माझ्या कुटुंबीयांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे. असं म्हणत मोदी यांनी मुनगंटीवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं.
9 / 10
या सभेत बोलताना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर विशेषतः कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
10 / 10
या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांवर जोरदार टीका केली.