Reshma Shinde Mehendi Ceremony Photos Viral : मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे छोट्या पडद्यामुळे घराघरांत पोहोचली आहे. ती आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
रेश्माने तिच्या मेहंदीत 29 नोव्हेंबर लिहून घेतलंय. ही तिच्या लग्नाची तारीख असल्याचं समजतंय.
मेहंदी सोहळ्यासाठी रेश्मा खास पारंपरिक लूकमध्ये दिसली. हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने ‘माझी मेहंदी’ असं कॅप्शन दिलंय.
नुकतीच रेश्माची मेहंदी सेरेमनी देखील पार पडली आहे. तिच्या हातावरच्या मेहंदीच्या डिझाइनने मात्र सर्वांचं लक्ष वेधलंय.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रेश्मा शिंदेचं केळवण देखील पार पडलं होतं. रेश्माच्या घरी आता लगीनघाई सुरू झालीय.
रेश्माच्या हातावर मेहंदी सजली आहे. तिच्या मेहंदीच्या डिझाईनमध्ये सनई-चौघडे, लग्नगाठ, नवरा-नवरीची प्रतिमा पाहायला मिळतेय.