Download App

PHOTOS : लोकसभेत ‘मोर’ तर राज्यसभेत ‘कमळ’ थीम; नवीन संसदेचा प्रत्येक कोपरा दिसतोय स्मार्ट

  • Written By: Last Updated:
1 / 5

जुने संसद भवन गोल आहे. मात्र नवीन संसद भवनाचा आकार त्रिकोणी ठेवण्यात आला आहे. त्याच्या आतील भागात तीन राष्ट्रीय चिन्हे आहेत - कमळ, मोर आणि वटवृक्ष. या थीमवर नवीन इमारत बांधण्यात आली आहे.

2 / 5

संविधान सभागृह नवीन संसद भवनाच्या मध्यभागी आहे. त्याच्या वर एक अशोक स्तंभ आहे. संविधान सभागृहाच्या एका बाजूला लोकसभा आणि त्याचे औपचारिक प्रवेशद्वार आहे. दुसऱ्या बाजूला राज्यसभा आणि त्याचे औपचारिक प्रवेशद्वार आहे.

3 / 5

राज्यसभेची थीम राष्ट्रीय फुल कमळावर आधारित आहे. हॉलमध्ये ऑडिओ-व्हिडिओची सोय आहे. म्हणजेच प्रत्येक डेस्कवर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसवली आहेत. येथे 394 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पाहण्यासाठी मोठी प्रेक्षक गॅलरीही तयार करण्यात आली आहे.

4 / 5

सेंट्रल लाउंज हे कॉन्स्टिट्यूशन हॉलच्या तिसऱ्या बाजूला आहे. खासदारांच्या बसण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था येथे आहे. इथे एक मोकळी जागा आहे, तिथे वटवृक्ष लावण्यात आला आहे. उर्वरित नवीन इमारतीत मंत्र्यांचे कार्यालय आणि समिती कक्ष करण्यात आले आहेत.

5 / 5

नवीन संसद भवनाला पंचतारांकित प्लॅटिनम दर्जा देण्यात आला आहे. यात सर्व प्रकारचे स्मार्ट फीचर्स आहेत. कमाल सिस्मिक झोन-5 च्या पॅरामीटर्सवर 150 वर्षांची गरज लक्षात घेऊन ही इमारत तयार करण्यात आली आहे.

Tags

follow us