Nitin Gadakari : देशातील सर्वाधिक लांबीच्या मुंबई- दिल्ली एक्सप्रेस वे चे हे फोटो पहा
letsupteam
Untitled Design (18)
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर हँडेलवर मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेचे काही फोटो शेअर केले आहेत.
तसेच आम्ही जगातील सर्वात वेगवान विकसीत द्रुतगती मार्ग तयार करीत आहोत. जो 93 एनएमपीला कनेक्टिव्हिटी प्रदान करतो.
या हायवेमुळे प्रवासाचा वेळ 24 तासांवरून 12 तासांपर्यंत कमी करण्यासाठी अलाइनमेंट ऑप्टिमायझेशनसह 8-लेन प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे तयार केला जाईल.
त्यांच्या कामामुळे सर्व विरोधी पक्षातील सदस्य देखील त्यांचे कौतुक करत असतात.
यामुळे भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुंबई-दिल्ली महामार्ग हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग असून त्याची लांबी 1,386 किमी आहे.
याहायवेमुळे जेवर व नवी मुंबई येथील ग्रीनफिल्ड विमानतळ आणि जेएनपीटी येथील बंदरांसाठी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, असे सांगितले आहे.
नितीन गडकरी यांनी गेल्या आठ वर्षात देशभरात मोठ्या प्रमाणावर हायवे बांधले आहेत.
त्यांनी पंढरपूरचा पालखी मार्ग देखील बांधायला घेतला आहे.
या दिल्ली-मुंबई हायवेचे अनेक फोटो त्यांनी आपल्या ट्विटरवर टाकले आहेत.