Republic Day : कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचा अभूतपूर्व सोहळा, पाहा पथसंचलनाचे फोटो
kabir letsupp
Republic Day
Republic Day : देशात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत.
पीएम नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांसह राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
यानंतर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म यांनी तिरंगा फडकवला. पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्यासह सर्व मान्यवरांनी ध्वजाला मानवंदना दिली.
दरवर्षी सैन्याचा बँड वाजवून परेडला सुरुवात होते. मात्र, यंदा पारंपरिक वाद्य वाजवून परेडला सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला केंद्र सरकारमधील मंत्री, सरकारी अधिकारी यांच्यासह देशभरातील नामवंत व्यक्ती हजर होते
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताच्या तिन्ही सैन्यदलांतर्फे शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन केले गेले.
यावेळी कर्तव्यपथावर चित्ररथांचीही परेड पार पडली. या चित्ररथांमधून देशाच्या विविधतेचं दर्शन घडलं.
महाराष्ट्राच्या चित्ररथाची छत्रपती शिवराय, जिजाऊ, राजमुद्रा अशी थीम यंदा होती.
यावेळी तीनही दलांचं संचलन पाहण्यासारखं होतं.