Oscar 2024 : ऑस्कर पुरस्कारांमध्ये ओपेनहायमरचा दबदबा, सिलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
shruti letsupp
Oscar Winner 2024
फक्त २७० लोक, 5 डॉलरचं तिकीट अन् १२ पुरस्कार.. वाचा, ‘ऑस्कर’च्या इतिहासातील खास गोष्टी
गेल्या काही दिवसांपासून चाहते, समीक्षक, चित्रपट अभ्यासक हे या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत होते.
सिलियन मर्फीला ‘ओपेनहायमर’मधील त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला आहे.
या चित्रपटाला 13 नामांकनांसह यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वाधिक नामांकने मिळाली होती. त्यापैकी 7 पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत.
‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साऊंडचा पुरस्कार मिळाला. तर ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार मिळाला.
‘द लास्ट रिपेअर शॉप’ने सर्वोत्कृष्ट डाक्युमेंटरीचा ऑस्कर जिंकला. बेन प्राउडफूट आणि ख्रिस बॉवर्स यांनी याचे दिग्दर्शन केले होते.
या पुरस्कार सोहळ्यात एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जगप्रसिद्ध रेसलर आणि अभिनेता जॉन सीना ऑस्कर सोहळ्यात स्टेजवर नग्न अवस्थेत दिसला.
जॉनने विवस्त्र अवस्थेत स्टेजवर येऊन पुरस्काराची घोषणा केली.