Download App

Republic Day : ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर परेड, पाहा फोटो

  • Written By: Last Updated:
1 / 9

Republic Day 2024 : स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) आज आपण साजरा करत आहोत. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

2 / 9

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

3 / 9

75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी पार्क येथील ध्वजारोहण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हजर होते.

4 / 9

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील जनेतला संबोधित केलं.

5 / 9

यावेळी त्यांनी गेल्या वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले.

6 / 9

अटल सेतू, कोस्टल रोड, धारावी विकास, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्प, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड हायवे या प्रकल्पांमुळे राज्याचा सर्वांगीण विकासात मोलाची भर पडणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले

7 / 9

यावेळी देशाची सुरक्षा सांभाळणारे भारतीय नौदल, गोवा पोलीस, एसआरपीएफ, मुंबई पोलीस दल यांनी शानदार संचलन केलं.

8 / 9

याशिवाय, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलिसांचे पथक, सी-60 पोलिसांचे पथक, रेल्वे पोलीस दल यांच्याही वतीने परेड करण्यात आली.

9 / 9

तसेच राज्य शासनाचे नगरविकास, मृद आणि जलसंधारण, उमेद, अल्पसंख्याक विभाग, आदिवासी विकास अशा विविध विभागांचे चित्ररथ देखील या संचलनात सहभागी झाले होते.

follow us