PHOTO : अभिनयाशिवाय बी-टाऊनचे हे स्टार्स या साईड बिझनेसमधून मोठी कमाई करतात
letsupteam
55
अमिताभ बच्चन – या यादीत पहिले नाव आहे ते शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे. जे एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनयासोबतच ते शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करतात. 2013 मध्ये बिग बींनी जस्ट डायल नावाच्या कंपनीत 10 टक्के हिस्सा घेतला होता.
शाहरुख खान – शाहरुख खानच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. जो साईड बिझनेस करतो. शाहरुख खानची रेड चिली नावाची प्रोडक्शन कंपनी देखील आहे.
सलमान खान – बॉलीवूडचा दबंग म्हणजेच सलमान खान अभिनयाव्यतिरिक्त अनेक व्यवसायही चालवतो. अभिनेत्याचा बीइंग ह्युमन नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे. ज्यांचे स्टोअर्स भारतातच नाही तर परदेशातही आहेत.
अक्षय कुमार – अभिनेता अक्षय कुमार याचेही ऑनलाइन शॉपिंग चॅनल आहे. ज्याचे नाव बेस्ट डील. याशिवाय त्यांचे हरी ओम नावाचे प्रोडक्शन हाऊसही आहे. या मधून तो करोडो रुपयाची कामे करतो.
शिल्पा शेट्टी – बॉलिवूडची फिटेस्ट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचेही अनेक व्यवसाय आहेत. तिचे एक रेस्टॉरंटही आहे. याशिवाय ही अभिनेत्री एका स्पा ची मालकही आहे.