Download App

Photos: पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यातील क्षणचित्रे

1 / 7

पुणे शहरातील चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

2 / 7

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषद सभापती निलम गोऱ्हे हे उपस्थित आहेत. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत.

3 / 7

पुणेस्थित पुणे-बैंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारला असून या चौकात कायमच वाहतूक कोंडी होत असत. त्यामुळे 1 ऑक्टोबरला जुना पूल पाडण्यात आला होता.

4 / 7

त्यानंतर चौकात नवा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या नव्या प्रकल्पामुळे चांदणई चौकातल्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे.

5 / 7

पुण्याला पेट्रोल डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही. मी पन्नास हजार कोटीत पुण्याचे सर्व उड्डाणपूल बांधून द्यायला तयार आहे. असं यावेळी नितीन गडकरी म्हणाले.

6 / 7

पुणे हे विचारवंतांचे शहर आहे. इथे निर्णय घेणे सोपे नाही. पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोपेक्षा आधी सुरु झाले होते. मात्र पुर्ण आधी नागपूरचे झाले. असं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

7 / 7

पुणे शहरातील चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजितदादांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. काँग्रेसवर जोरदार टीका तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शेलक्या शब्दांत सुनावलं.

Tags

follow us