PM Modi : पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे रक्षण करणाऱ्या जवानांसोबत यावेळी दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी सुरक्षा दलांचे मनोबल वाढवले.
shakir sayyad
PM Modi : पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे रक्षण करणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी सुरक्षा दलांचे मनोबल वाढवले.
पीएम मोदी गुजरातमधील कच्छ येथे पोहोचले जेथे त्यांनी बीएसएफ, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
गुजरातमधील सर क्रीक भागातील या भागाला लक्की नाला म्हणतात, जो पाकिस्तानच्या सीमेच्या अगदी जवळ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्रूझमध्ये सैनिकांसोबत काही वेळ घालवला आणि त्यांचे मनोबल वाढवला.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएफचा गणवेश परिधान केले आणि सैनिकांना मिठाई वाटली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांना संबोधित करताना म्हणाले, “यावेळची दिवाळी खूप खास आहे, तुमच्यामध्ये सुरक्षेची हमी दिसत आहे, आमचे सैनिक प्रत्येक आव्हानाला सामोरे जातात, मातृभूमीची सेवा करणे हे माझे भाग्य आहे.”
बीएसएफ, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समधील आपल्या शूर जवानांसोबत दिवाळी साजरी करताना आनंद झाला. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या दरम्यान सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर भारतीय सीमेचे रक्षण कसे करतात हे पंतप्रधानांनी अनुभवण्याचा प्रयत्न केला.