पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (4 जानेवारीला) लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची संवाद साधला.
2 / 7
तसेच यावेळी त्यांनी समुद्रकिनाऱ्याची सैर केली. या ठिकाणचे नयनरम्य फोटो देखील त्यांनी त्यांच्या एक्स या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.
3 / 7
या फोटोंमधील खास गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर स्नॉर्कलिंग केलं या एडवेंचरचे फोटो देखील त्यांनी शेअर केले.
4 / 7
फोटो ना कॅप्शन देताना ते म्हटले की, जे लोक एडवेंचर करू इच्छितात. त्यांच्या यादीमध्ये लक्षद्वीप असायलाच पाहिजे. मी स्नॉर्कलिंगचा प्रयत्न केला हा अनुभव आनंददायक होता.
5 / 7
तसेच या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी समुद्रकिनारी फिरताना आणि निवांतपणे समुद्रकिनारी खुर्चीवर बसलेले दिसत आहेत.
6 / 7
त्याचबरोबर आपल्या अनुभवाबद्दल पुढे मोदी म्हणाले की, लक्षद्वीप हा केवळ बेटांचा समूह नाही. तर ही एक परंपरेचा वारसा आहे.
7 / 7
येथील लोकांच्या भावना या निसर्गामध्ये स्पष्ट उमटतात. माझा हा प्रवास शिकण्यासाठी आणि पुढची वाटचाल करण्यासाठी मला समृद्ध करेल.