पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
2 / 8
शनिवारी सकाळी त्यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात हत्ती आणि जीप सफारी केली.
3 / 8
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या पहिल्या भेटीत पीएम मोदींनी पार्कच्या सेंट्रल कोहोरा रेंजमधील मिहिमुख परिसरात प्रथम हत्ती सफारीवर केली आणि नंतर त्याच रेंजमध्ये जीप सफारीवरही केली.
4 / 8
पीएम मोदींसोबत पार्कच्या संचालक सोनाली घोष आणि इतर वरिष्ठ वन अधिकारीही होते.
5 / 8
PM मोदी दुपारी जोरहाटमध्ये प्रसिद्ध अहोम जनरल लचित बारफुकन यांच्या 125 फूट उंच 'स्टॅच्यू ऑफ शौर्य'चे उद्घाटन करणार आहेत.
6 / 8
उद्घाटन समारंभानंतर, पंतप्रधान जोरहाट जिल्ह्यातील मेलेंग मेटेली पोथरला भेट देणार आहेत.
7 / 8
पीएम मोदी शुक्रवारी संध्याकाळी तेजपूरला पोहोचले, तिथे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांचे स्वागत केले. रात्रीच्या विश्रांतीनंतर त्यांनी आज सकाळी काझीरंगाला भेट दिली.
8 / 8
पंतप्रधान मोदी काझीरंगा येथे पोहोचण्यापूर्वी सर्व सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्या होत्या. पीएम मोदी काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जवळपास 2 तास थांबले होते.