PM मोदींच्या आठ खासदारांसोबत स्पेशल लंच… पाकिस्तानचा किस्सा केला शेअर
shruti letsupp
Narendra Modi
आज (9 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या कॅन्टीनमध्ये काही खासदारांसोबत लंच केलं.
त्यामध्ये आठ खासदारांनी पंतप्रधानांसोबत शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला.
याचवेळी पंतप्रधानांनी 2015 मध्ये जेव्हा ते पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी गेले होते. तेव्हाचा किस्सा सांगितला.
25 डिसेंबर 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अचानक पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवास शरीफ यांच्या घरी गेले होते.
अफगाणिस्तान दौऱ्यावरून परत येताना लाहोर एअरपोर्टवर उतरल्यानंतर नवाज शरीफ यांच्याकडून मोदी यांचे स्वागत करण्यात आलं होतं.