Download App

पूजा सावंतच्या शाही विवाहसोहळाचा थाट; अभिनेत्रीने शेअर केले खास क्षण, पाहा फोटो

1 / 8

अखेर अभिनेत्री पूजा सावंत झाली चव्हाण घराण्याची सून!'

2 / 8

मराठी सिनेसृष्टीत एक शाही विवाहसोहळा पार पडला. तो म्हणजे सगळ्यांची लाडकी पूजा सावंतचा. काल मुंबईत सिद्धेश चव्हाणसोबत आयुष्यभराची गाठ बांधली.

3 / 8

पूजा आणि सिद्धेश चव्हाणच्या वेडिंग फंक्शन्सला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली होती. तिच्या मेहंदी, हळद, संगीतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

4 / 8

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण या क्युट कपलने खूप धमाल केली. तसंच मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या आनंदात सहभागी होती.

5 / 8

काल 28 फेब्रुवारी रोजी पूजा आणि सिद्धेशने साताजन्माची गाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो कधी येतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागलं होतं. अखेर पूजाने तिच्या शाही विवाहसोहळाचं अल्बमच पोस्ट केला आहे.

6 / 8

पूजा सावंतच्या लग्नसोहळ्याला कुटुंबियांसह मनोरंजनक्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

7 / 8

पूजा सावंतने पिवळी नऊवारी, हातात हिरव्या बांगड्या, डोईला मुंडावळ्या, साजेसे दागिने या नव्या नवरीच्या लूकमध्ये सौंदर्य खुलून आलं आहे.

8 / 8

फुलांची सजावट असलेल्या मंडपात त्यांनी सातफेरे घेतले. यावेळी आजबाजूचं वातावरणही गुलाबी झाल्याचं दिसत आहे. पूजा सिद्धेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज