PM Narendra Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिककरांनी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले आहे.
शहरात दाखल होताच मोदींचा रोड शो झाला. यावेळी मोठ्या संख्येनें नाशिककर उपस्थित होते.
या रोड शोनंतर मोदी यांनी रामकुंड परिसराला भेट दिली. यावेळी मोदींच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
या जलपूजनानंतर पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरात (Kalaram temple) दर्शनासाठी प्रवेश केला. काळाराम मंदिराच्या मुख्य दरवाजातून मोदींनी प्रवेश केला.
मोदी यांना पुरोहित संघाच्यावतीने चांदीचा कुंभ आणि पगडी घालून स्वागत केले. यावेळी भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्धार करण्यात आला.
त्यानंतर मोदींनी प्रथम हनुमानजींचे दर्शन झाले. नंतर काळाराम मंदिरातील प्रभू रामाचेही दर्शनही घेतले.
यानंतर मोदींनी भगवान श्रीरामाची विधिवत पूजा केली. मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी मोदींना पूजा सांगितलं.
पंतप्रधान मोदींनीं काळाराम मंदिरात खणखणीत टाळ वाजवून भजन देखील केले. यावेळी ते प्रभू रामांच्या भक्तीत तल्लीन झाले.
यावेळी रामरक्षा पठण देखील करण्यात आली होती.