काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या पीडितांची भेट घेतली.
2 / 16
हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर राहुल गांधी यांनी पीडितांची भेट घेऊन राज्यातील जनतेला शांतीचा संदेश दिला.
3 / 16
मणिपूर दौऱ्याच्या दुसऱ्या राहुल गांधी यांनी बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग शहरातील दोन मदत शिबिरांना भेट दिली.
4 / 16
हिंसाचारातून कोणताही तोडगा निघणार नाही, शांतता हाच उपाय आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
5 / 16
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हिंसाचारग्रस्त बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग शहराला भेट दिली आणि तेथील मदत शिबिरांमध्ये पीडितांची भेट घेतली.
6 / 16
मणिपूरच्या राजधानीतील मदत शिबिरांना भेट देण्याबरोबरच राहुल गांधींनी काही नागरी संघटनांच्या प्रतिनिधींचीही भेट घेतली.
7 / 16
राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता हेलिकॉप्टरने मोइरांग येथे जाऊन तेथील बाधितांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
8 / 16
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हिंसाचारग्रस्त बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग शहराला भेट दिली आणि तेथील मदत शिबिरांमध्ये पीडितांची भेट घेतली.
9 / 16
राहुल गांधी मणिपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी राज्यातील नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली.
10 / 16
राहुल गांधी यांनी 56 दिवसांच्या हिंसाचारात मणिपूरमध्ये जातीय संघर्षामुळे विस्थापित झालेल्या पीडितांची भेट घेतली आणि सहानुभूती व्यक्त केली.
11 / 16
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिपूरच्या राज्यपालांची भेट घेतली.
12 / 16
काहींनी राहुल गांधींच्या भेटीला विरोध केला होता त्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
13 / 16
सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी त्यांना हेलिकॉप्टरने जाण्यास सांगितले होते.
14 / 16
राहुल गांधींच्या बिष्णुपूरच्या भेटीदरम्यान काही आंदोलकांनी त्यांना चुराचंदपूरला जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.
15 / 16
राहुल गांधींना चुरचंदपूरला जाण्यासाठी राज्य सरकारने हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले होते. हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी होते.
16 / 16
राहुल गांधींनी गुरुवारी (२९ जून) मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये जातीय संघर्षामुळे विस्थापित झालेल्या लोकांची भेट घेतली.