Download App

रायडर लूकमध्ये राहुल गांधी! लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो तलावावर पोहोचले

  • Written By: Last Updated:
1 / 6

काँग्रेस नेते राहुल गांधी आज केंद्रशासित प्रदेश लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी आज आपल्या पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. लडाखमधील विविध ठिकाणी तरुणांशी संवाद साधणार आहेत. यावेळी राहुल गांधींचा एका वेगळ्या अंदाजात दिसला.

2 / 6

आज सकाळी राहुल गांधी रायडर लूकमध्ये दिसले आणि पॅंगॉन्ग त्सो झीलकडे रवाना झाले. राहुल गांधींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3 / 6

राहुल गांधींनी KTM बाईक आणि स्पोर्ट्स हेल्मेट घालून लडाखच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसत आहे.

4 / 6

राहुल गांधी त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लेह येथील पॅंगॉन्ग झीलवर त्यांना आदरांजली वाहणार आहेत. 20 ऑगस्ट 1944 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म झाला होता. काँग्रेस हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करते.

5 / 6

इन्स्टाग्रामवर आपला फोटो शेअर करत राहुल गांधींनी लिहिले, "पॅंगॉन्ग झीलच्या वाटेवर.. ज्याबद्दल माझे वडील म्हणायचे, ते जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे."

6 / 6

कलम 370 आणि 35 (ए) रद्द केल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरपासून वेगळे झाल्यानंतर नवीन केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिला लडाख दौरा आहे.

Tags

follow us