Sapana Gill : पृथ्वी शॉ सोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल?
letsupteam
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (42)
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला होता.
या व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ आणि एका तरुणीमध्ये वाद सुरु असल्याचे दिसून आले होते.
पृथ्वी शॉसोबत वाद घालणारी ही तरुणी अभिनेत्री सपना गिल (Sapna Gill) आहे.
सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला.
सपनाने ‘काशी अमरनाथ’ आणि ‘निरहुआ चलल लंदन’ या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
दरम्यान सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
पृथ्वीच्या मित्राने या व्हिडीओचे शुटींग केले होते.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.
तिला अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली. तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.