Sharad Pawar यांच्यासाठी काय पण, कार्यकर्त्यांनी आणला ड्रायफ्रुटचा भला मोठा हार, पाहा फोटो
shruti letsupp
Sharad Pawar
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्यावरील प्रेम नेहमीच पाहायला मिळत. त्यात कुणी रिक्षेवर पवारांचं नाव लिहीतं तर कोणी रक्ताने पत्र लिहितं. त्यात आता आणखी एक अनोखा भेट त्यांना देण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त शरद पवारांना भेट म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एक खास वस्तू दिल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी कार्यकर्त्यांनी एक भला मोठा ड्रायफ्रूटचा हार शरद पवारांना त्यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी दिला आहे.
यावेळी उदय प्रमोद महाले, आणि श्रीकांत पाटील जे पुण्याचे माजी नगरसेवक आहेत. यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या भल्या मोठ्या हारामध्ये विविध प्रकारचे ड्राय फ्रुट्स होते. ज्यामध्ये शरद पवार यांच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स विशेषतः घालण्यात आल्याचं या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं आहे.