27 वर्षांचा दुष्काळ संपला…, दक्षिण आफ्रिका बनला WTC चॅम्पियन; पहा फोटो
shakir sayyad
World Test Championship
दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाला धक्का देत लॉर्ड्सच्या मैदानावर बाजी मारली. या सामन्यात आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने पराभव करत 27 वर्षांनंतर पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली.
आफ्रिकेने 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात शेवटचे आयसीसी जेतेपद जिंकले होते. यासह, दक्षिण आफ्रिका सर्वात मोठ्या अंतरानंतर ट्रॉफी जिंकणारा संघ बनला आहे.
सलग 7 कसोटी जिंकून WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने एन्ट्री केली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयात वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि सलामीवीर एडेन मार्करामने महत्वाची भूमिका बजावली. रबाडाने सामन्यात 9 बळी घेतले आणि मार्करामने चौथ्या डावात 136 धावा केल्या.
कर्णधार टेम्बा बावुमानेही हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजताना 66 धावा केल्या. याचबरोबर बावुमा आयसीसी जेतेपद जिंकणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बनला.
यापूर्वी, दिवंगत हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली, दक्षिण आफ्रिकेने 1998 मध्ये विल्स आंतरराष्ट्रीय कपचे विजेतेपद जिंकले होते.
पहिल्या डावात 212 धावांवर गारद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 138 धावांत गुंडाळून आपली स्थिती मजबूत केली होती.
रबाडाची शानदार गोलंदाजी सामन्यात 9 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर नेले .
या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचे लक्ष्य दिले होते. आफ्रिकेने हा सामना पाच विकेट्सने जिंकला.